Kisan Credit Card (KCC) ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली सरकारी योजना आहे. kisan credit card याचा उद्देश शेतकऱ्यांना अल्पकालीन आर्थिक मदत देणे हा आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. ही योजना 1998 साली सुरू करण्यात आली होती.
हे पण वाचा | सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ निधी उपलब्ध पहा नवीन जी आर
किसान क्रेडिट कार्ड 5 लाख मर्यादा घोषणा 2025 | kisan credit card
2025 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. पूर्वी 3 लाख रुपयांपर्यंत मिळणारे किसान क्रेडिट कार्ड कर्ज आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ही नवीन मर्यादा लागू झाली असून शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.
हे पण वाचा | गाडी घेण्यासाठी 20 लाख रुपये पर्यंत कर्ज | आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत
KCC साठी कोण पात्र आहे?
खालील शेतकरी KCC साठी अर्ज करू शकतात:
- स्वतःच्या नावावर शेती असलेले शेतकरी
- भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरी
- शेतकरी गट (Farmer Groups)
हे पण वाचा | कुक्कुट पालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 25 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान
किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे (2025 लिस्ट)
KCC साठी अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतील:
- आधार कार्ड
- सातबारा उतारा
- 8-अ उतारा
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे सभासदत्व प्रमाणपत्र
हे पण वाचा | घरकुल योजना महाराष्ट्र 2024- 2025 | 2025 नवीन यादी
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज व व्याजदर 2025
- 1 लाख रुपये पर्यंत: बिनव्याजी कर्ज उपलब्ध.
- 1.60 लाख रुपये पर्यंत: कोणतेही तारण आवश्यक नाही.
- 3 लाख ते 5 लाख रुपये पर्यंत: तारण द्यावे लागते.
- व्याजदर: 7% आहे, परंतु वर्षभरात कर्ज परत केल्यास 3% सूट मिळते आणि प्रत्यक्ष व्याज 4% राहते.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी घसरण,सोने खरेदीचा उत्साह वाढला, सोन्याचा आजचा भाव पहा
कर्ज प्रक्रिया कशी आहे?
- जवळच्या बँकेत जाऊन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे द्या.
- बँक कागदपत्रांची पडताळणी करेल.
- मंजुरी मिळाल्यावर काही दिवसांतच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.
महत्त्वाचे फायदे:
- अल्प व्याजदरावर आर्थिक मदत मिळते.
- पिकांसाठी खत, बियाणे, औषधे खरेदी करता येतात.
- शेतीशी संबंधित इतर खर्च भागवता येतो.
- वेळेवर परतफेड केल्यास व्याजात सूट मिळते.