शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. Kisan Credit Card Loan याचा थेट देशभरातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होईल. विशेष म्हणजे हे कर्ज अवघ्या 4% वार्षिक व्याजदराने उपलब्ध होणार आहे.
है पण वाचा | केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एकमेव गिफ्ट
किसान क्रेडिट कार्ड (KCC) म्हणजे काय? |Kisan Credit Card Loan
KCC हा सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला एक विशेष क्रेडिट स्कीम आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी व्याजदराने लोन (Loan) मिळते. यामुळे शेतकऱ्यांना खत, बियाणे, औषधं, शेतीची साधने यासाठी त्वरित भांडवल उभे करता येते.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळतील?
✔ अधिक कर्ज मर्यादा: पूर्वी 3 लाख होती, आता 5 लाख पर्यंत मिळेल. ✔ कमी व्याजदर: फक्त 4% वार्षिक व्याज (सरकार 3% अनुदान देते). ✔ जलद प्रक्रिया: ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध. ✔ NPA टाळा: वेळेवर परतफेड केल्यास फायदे.
किसान क्रेडिट कार्डसाठी पात्रता (Eligibility)?
👉 कोण मिळवू शकतो?
- शेती करणारे सर्व शेतकरी (Land Owner Farmers)
- मत्स्यव्यवसाय (Fisheries), दुग्धव्यवसाय (Dairy Farming), पशुपालन (Animal Husbandry), फळबागायती (Horticulture) करणारे शेतकरी.
- अर्जदाराचा भारतीय नागरिक असणे आवश्यक.
- वय 18 ते 75 वर्षांदरम्यान असावे.
है पण वाचा | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सोयाबीन खरेदीला मुदत वाढ
किसान क्रेडिट कार्ड कुठे आणि कसे मिळेल?
✅ बँका जिथे अर्ज करता येईल:
- SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया)
- PNB (पंजाब नॅशनल बँक)
- BOI (बँक ऑफ इंडिया)
- HDFC, ICICI, AXIS बँक
- ग्रामीण बँका आणि सहकारी बँका
📌 अर्ज कसा करावा? 👉 ऑफलाईन: शेतकरी जवळच्या बँक शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. 👉 ऑनलाईन: संबंधित बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) अर्ज करता येतो.
है पण वाचा | प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना 2025 | 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज व्यवसाय करण्यासाठी लगेच अर्ज करा
किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
📝 अर्ज करताना खालील Documents लागतील: ✅ आधार कार्ड ✅ पॅन कार्ड (PAN Card) ✅ जमिनीचे 7/12 उतारे ✅ पासपोर्ट साईज फोटो ✅ बँक पासबुकची झेरॉक्स
है पण वाचा | सोलार रूफटॉप योजनेसाठी असे करा अर्ज आणि मिळवा मोफत सोलार
KCC अंतर्गत कर्जावरील व्याजदर आणि सरकारचे अनुदान
💰 शेतकऱ्यांना 7% व्याजदराने कर्ज मिळते. पण जर शेतकऱ्यांनी वेळेवर परतफेड केली, तर सरकार 3% व्याज अनुदान देते. यामुळे शेतकऱ्यांना फक्त 4% व्याज द्यावे लागते.
❌ जर वेळेवर कर्ज परतफेड केली नाही, तर 7% व्याज लागू होते आणि खाते NPA होऊ शकते.
कर्ज फेडण्याची मुदत आणि नियम
🕒 महत्वाचे नियम: ✔ कर्जाचा कालावधी: 5 वर्षे ✔ 5 वर्षांनी कार्डाचे नूतनीकरण करावे लागेल ✔ वर्षातून दोनदा व्याज भरावे लागेल ✔ वेळेवर परतफेड केल्यास व्याज अनुदानाचा लाभ मिळेल ✔ NPA टाळण्यासाठी वेळेत कर्ज फेडा
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
📢 सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी 4% वार्षिक व्याजदराने 5 लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकतात. यामुळे शेती उत्पादन वाढेल, आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल, आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारेल.
🚜 तुमचं किसान क्रेडिट कार्ड मिळवा आणि शेतीसाठी योग्य भांडवल उभे करा!